देवगड तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न

14

देवगड तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली देवगड हायस्कूल केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेली युवा मतदान केंद्र ही स्वागत कमान युवा मतदान करण्याचा उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरला .देवगड तालुक्यात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया सुरुवात झाली दुपारी १ पर्यंत सरासरी ३३ % मतदान होते ग्रामीण भागातही काही केंद्रांवर दुपार पर्यंत चांगले मतदान होते.

मतदान केंद्राच्या हद्दीबाहेर महायुती व महाविकास आघाडीचे बूथ होते कार्यकर्ते बूथवर ठाण मांडून अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्नशील होते.
आमदार नितेश राणे शिवसेना प्रमुख दुधवडकर, माजी आमदार ऍड गोगटे,अतुल रावराणे यांनी ठीक ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांनी संवाद साधला व मतदानाचा आढावा घेतला. देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवगड शहरातील देवगड हायस्कूल या मतदान केंद्र ६२ मतदान केंद्र समोर उभारण्यात झालेली आकर्षक कमान ही युवा मतदाकरीता सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरला .

या स्वागत कमानी वरील देश आपला आपण देशाचे सिद्ध करू सज्ञान असल्याचे तसेच माय व्होट, माय फ्युचर या संदेशेद्वारे युवा वर्गाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे व युवा मतदानाचा हक्क बजावून अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.