तांडेल खून प्रकरणी खलाशाला जामीन मंजूर
देवगड (प्रतिनिधी)दिनांक ५ मे २०२४
देवगड बंदरातील ‘मुक्ताई’ या मासेमारी बोटीवर दि. ११/१२/२०२३ रोजी पहाटे ४.०० चे सुमारास लोखंडी भाल्याने हल्ला चढवून तांडेल रणजीत डोर्लेकर याचा खून केल्याप्रकरणी आणि सह खलाशांवर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जखमी केल्याप्रकरणी तसेच मासेमारी बोट जाळून टाकल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी अनंत रामचंद्र तांबे याची मे. सत्र न्यायालयाने जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी आरोपीच्या वतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी युक्तीवाद केला.





