हरकुळ बुद्रुक कोटेश्वर पाराचा जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त २५ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

63

हरकुळ बुद्रुक कोटेश्वर पाराचा जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त २५ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

कणकवली (प्रतिनिधी)दि २४ एप्रिल

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील श्री.देव कोटेश्वर पाराचा जीर्णोद्धार सोहळा २५ ते २७ एप्रिल असा तीन दिवसीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम व प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.


२५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता प्रायश्चित, कुलदेवतादी देवतांना विडा, नारळ ठेवून आमंत्रण, गणेश पूजन, पुण्याहवाचन, प्राकार शुद्धी जलाधिवासपूर्वक स्नान वियी ब्रह्मदिमंडल वास्तुमंडल ग्रहस्थापना पूजा, निद्रावास, वास, वास्तू होम ग्रह होम व दुपारनंतर स्थानिक भजने, हरिपाठ होणार आहे. २६ एप्रिल रोजी मुख्य देवता पूजन व हवन, मूर्ती घेऊन देवळाभोवती प्रदक्षिणा, तत्वहोम, मूर्ती स्थापनेचा मुहूर्त प्राणप्रतिष्ठा, महापूजा, अश्वत्य उद्यापण मुंज बलिदान, पूर्णश्रुती, अभिषेक, देवतांना प्रार्थना, महाप्रसाद, दुपारनंतर महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ते ७ ते ९ सुजित परब यांचे भजन, रात्री १० वाजता ह. भ. प. भाऊ नाईक, वेतोरे यांचे कीर्तन होणार आहे. २७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. कावलेवाडीची सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, हरिपाठ, रात्री १० वाजता भजनांचा तिरंगी सामना बुवा अभिषेक शिरसाठ (हरकुळ बुद्रुक) विरुद्ध बुवा सतीश सावंत (मिरवंडे) विरुद्ध बुवा संदीप पुजारे (नाडण) यांच्यात होणार आहे.