महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथे आज ६:३० मशाल पदयात्रा
सावंतवाडी (प्रतिनिधी) दिनांक २४ एप्रिल २०२४
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील खासदारकिचे उमेदवार शिवसेना नेते विनायक राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 24/04/2024 रोजी संध्याकाळी 06.30 वा. सावंतवाडी गवळी तिठा येथून मशाल पदयात्रा ( मशाल फेरी) काढण्यात येणार आहे.तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व राऊत प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.





