भाजपचे संकल्प पत्र म्हणजे मोदीजी ची गॅरंटी..!आमदार नितेश राणे
युवक,शेतकरी,महीला,वृद्ध,अशा प्रत्यके घटकाचा विचार करून विकासाचा केला आहे संकल्प
संकल्प पत्रातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षात होणार पूर्ण
कणकवली (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे संकल्प पत्र (जाहीरनामा) म्हणजेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची गॅरेंटी आहे. 2019 मध्ये ज्या पद्धतीने संकल्प पत्रातून जनतेला आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा 2024 निवडणुकीत दिली जाणारी सर्व आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण केली जातील. देशभरातील 15 लाख जनतेच्या सूचनांवरून हे संकल्प पत्र बनविलेले आहे.
यात युवकांच्या कल्याणासाठी,रोजगारासाठी,नोकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक संकल्प करण्यात आलेले आहेत. रेल्वे सारख्या दळणवळणाच्या सेवेत अमलाग्र बदल करून दर्जेदार सेवा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहे.
समान नागरी कायदा, भ्रष्टाचार मुक्त भारत,देवस्थान तीर्थक्षेत्रांचा विकास.पर्यटन विकास,महिलांना पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष व यंत्रणा असा सर्वांगीण विचार करून हे 76 पानाचे संकल्प पत्र बनवलेले आहे. अशी माहिती भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली येथे प्रहार भवन च्या सभागृहात पत्रकार परिषद झाली.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही लोकसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेले आहे.त्याबाबतीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार घेत आहोत.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, कणकवली शहर मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष कानडे,आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,काँग्रेसमुळे जाहीरनाम्यावर किंवा संकल्प पत्र ह्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.कारण या काँग्रेसने निवडणुकीत कागज का तुकडा असा प्रसिद्ध करायचा आणि नंतर ते विसरून जायचे अशी चुकीची प्रथा आणि पायंडा घातला.मात्र प्रधानमंत्री मोदी यांचे तसे नाही. त्यांनी जी,जी वचने दिली ती पूर्ण केली आहेत.
३७० कलम हठवले देशभर एकच कायदा लागू केला. राम मंदिर निर्माण केले. देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे काम सुरू केले. भारताला विकसित देश बनविण्यासाठी जे विकास काम करणे आवश्यक आहेत ते संकल्प पत्र भाजपने जाहीर केलेले आहे.
यात नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.
देशात,राज्यात किंवा जिल्हात ईद किंवा इतर सन उत्सवाला हिंदू धर्मियांनी विरोध केला नाही. सर्वत्र शांततेत सण पार पडला. जो नियम अन्य धर्मियांच्या सणाला असतो तोच नियम राम जन्म सोहळ्याला लावावा.असे आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.





