खासदार विनायक राऊत यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल

82

खासदार विनायक राऊत यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी (प्रतिनिधी)दि १६ एप्रिल २०२४

 

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळीत्यांच्यासोबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक उपस्थित होते.आजच्या दिवशी ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.*