नवी दिल्ली : नवीन वर्षाने पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १ जानेवारी २०२३ पासून गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आजपासून सिलिंडर महागला आहे. गेल्या वर्षभरात या गॅस सिलिंडरच्या किमती ५ वेळा बदलल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबईपासून पाटणापर्यंत सर्वच शहरांमध्ये गॅस सिलिंडर खरेदी करणे महाग झाले आहे.



