कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ एक आदर्श शिस्तबद्ध सेवाभावी सामाजिक संस्था आहे आणि ही त्यांची शिस्तबद्धता लायन्स महोत्सवात हजारोंच्या उपस्थितीत अनुभवता आली असे प्रतिपादन कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सामंत यांनी शनिवारी रात्री केले. गेले तीन दिवस चाललेल्या हा महोत्सवात सुमारे 25 हजाराहुन अधिकांनी उपस्थिती लावली.
कुडाळ हायस्कूल मैदानावर सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत या अनुषंगाने लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या वतीने 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत लायन्स ऑटो एक्स्पो फेस्टिवल 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सिंधुदुर्गसह मुंबई पुणे कोल्हापूर सातारा आदी भागातून विविध 87 स्टॉल सहभागी झाले होते. कोरोना महामारी संकटानंतर हा तीन वर्षानी झालेला लायन्स फेस्टिवल हजारोंच्या गर्दीचा उच्चांक गाठणारा ठरला तिन्ही दिवस विविध मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी देऊन भरभरून कौतुक केले. 31 डिसेंबरला कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सामंत, अरविंद शिरसाट संस्था पदाधिकारी सुरेश चव्हाण श्री रवळनाथ को ऑफ हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले कोल्हापूरचे डॉ दत्ता पाटील व्हिक्टर डॉन्ट्स लॉ कॉलेजचे संस्थापक व्हिक्टर डॉन्ट्स संविता आश्रमचे समाजसेवक संदीप परब यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यांचे लायन्स सेवा संकुल माजी अध्यक्ष ऍड अजित भणगे लायन्स अध्यक्ष ऍड समीर कुलकर्णी झोन चेअरमन सीए सागर तेली लायन्स सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत श्रीनिवास नाईक उद्योजक लायन आनंद बांदिवडेकर प्रकाश नेरुरकर ऍड शेखर वैद्य यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना श्री सामंत म्हणाले लायन्स ही एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी सामाजिक संस्था आहे येथील लायन्सचे पदाधिकारी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत गेली दोन वर्षे कोरोना महामारी संकटांमुळे सर्वत्र अशा गर्दीच्या कार्यक्रमाना बंदी होती दोन वर्षानंतर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ लागले आहेत तीन वर्षांनंतर हा असा गर्दीचा उच्चांक गाठणारा महोत्सव झाला विशेष म्हणजे तिन्ही दिवस एवढी हजारोंच्या संख्येने उपस्थिती असताना कुठेही गोंधळ गडबड झाली नाही शिस्तबद्धता या ठिकाणी दिसून आली याचे श्रेय हे लायन्सक्लब ऑफ सिंधुदुर्गच्या टीमला जाते असे सांगितले एम एल चौगुले यांनी लायन्स क्लबचा हा महोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे पर्यटनाला चालना देणारा हा महोत्सव असून भविष्यात अशा प्रकारचे महोत्सव झाले पाहिजे असे सांगितले.
व्हिक्टर डॉन्ट्स यांनी लायन्स क्लब गेली बरीच वर्षे असे महोत्सव घेत आहे आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे खाद्य व सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देणारे महोत्सव पर्यटनाची नांदी आहे असे सांगितले यावेळी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व लायन्स बरोबरच या त्यांच्या कार्यात सहकार्य करणारे क्लबचे झोन चेअरमन सागर तेली यांचे सहकारी सर्वेश प्रभुखानोलकर पृथ्वीराज चव्हाण कुणाल नालंद दुर्वांगी प्रभू प्रणव हरमलकर दीपक खराई यांचा लायन्स पदाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.




