बांदा : वेंगुर्ले पाल – गोडावणेवाडी येथील रहिवासी, व युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण मधील सेवानिवृत्त शिपाई विजय संभाजी गावडे वय ७२ यांचे शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने रहात्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे असा परीवार आहे. पाल येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद गावडे यांचे वडील व बांदा येथील पत्रकार राकेश परब यांचे मामा होत.





