लोकसहभागातून मिळालेले साहित्य चक्क ॲम्बुलन्स मधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी लावला उधळून
देवगड तालुक्यातील फणसगाव आरोग्य केंद्रातील प्रकार
देवगड (प्रतिनिधी)दि २४ मार्च २०२४
देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोकसभागातून मिळालेल्या नवीन खुर्च्या टेबल देवगडमधील आरोग्य अधिकारी कार्यालयात नेण्याचा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांचा मनसूबा फणसगाव पंचक्रोशीतील सजग नागरिकांनी उधळून लावला. विशेष म्हणजे फणसगाव पीएचसीच्या ॲम्बुलन्स मधून हे सामान भरून देवगडला नेण्यात येणार होते. तालुका अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील यांनी तोंडी आदेश देत सदर सामान देवगडला अन्याय सांगितल्यावरून सदर सामान देवगडला नेण्यात येणार होते. ॲम्बुलन्स मध्ये खुर्ची आधी साहित्य भरण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी याला आक्षेप घेतला भाजप कार्यकर्ते महेश उर्फ बंड्या नारकर, फणसगाव उपसरपंच उदय पाटील, गोवळ माजी उपसरपंच राजे जठार, बाबा नारकर यांनी ॲम्बुलन्स रोखून घरली व जाब विचारला व ते सर्व साहित्य पुन्हा फणसगाव पीएचसी मध्ये नेऊन ठेवायला भाग पाडले. सदर साहित्य शासनाने दिलेले नसून लोकसभागातून मिळालेले आहे पीएचसीची नूतन इमारत बांधणाऱ्या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीनुसार सामाजिक बांधिलकी जोपासत नवीन खुर्च्या टेबल आधी साहित्य पीएचसीला भेट दिली. मात्र लोकसभागातून फणसगाव पीएचसीला मिळालेले साहित्य देवगड मध्ये नेण्याचा हेतू काय ? तालुका आरोग्य अधिकारी सामान हलविण्याबाबत लेखी आदेश का दिले नाहीत ?आणि साहित्य वाहतुकीसाठी चक्क ॲम्बुलन्सचा वापर करण्याची हिम्मत कशी झाली? असे सवाल जनतेतून होत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हाशल्लचिकित्सक जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.





