बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज ;  सिंधुदुर्ग गोवा सीमेवर तात्पुरते तपासणी नाक्यांची उभारणी

56

बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज ;  सिंधुदुर्ग गोवा सीमेवर तात्पुरते तपासणी नाक्यांची उभारणी

 

बांदा (प्रतिनिधी) दि १८ मार्च २०२४

 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील मद्याला याठिकाणी सर्वाधिक मागणी असते. या बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला असून सिंधुदुर्ग गोवा सीमेवर तात्पुरते तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क खात्याने प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

१ मार्च २०२४ पासून आजच्या दिनांकपर्यंत गोवा राज्यातील अवैद्य मद्य वाहतूक किंवा विक्री प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार एकूण २१ गुन्हे नोंदविण्यात आले असून पाच वाहनासह २० लाख ३२ हजार ८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण २२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तपासणी नाके उभारण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयित वाहनांची कसून तपासणी करून गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या मद्यावर कटाक्षने पाळत ठेऊन कठोर कारवाई करणेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पत्रकात स्पष्ट म्हटले आहे.