माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजित बाबू कांबळे, आरे यांना मातृशोक

58

माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजित बाबू कांबळे, आरे यांना मातृशोक

देवगड (प्रतिनिधी)

आरे गावातील रहिवाशी माजी पंचायत समिती सदस्य, सामजिक कार्यकर्ते श्री. अजित बाबू कांबळे यांच्या मातोश्री श्रीम.चंद्रभागा बाबू कांबळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी, आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी संध्याकाळी ठीक 8.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात त्यांचे मुलगे अजित बाबू कांबळे, सुन प्रेरणा अजित कांबळे, मुली रश्मी नेरूरकर, संगीता नेरूरकर, प्राजक्ता प्रभाकर कांबळे (रोहा- रायगड), नातू अर्थ, समर्थ, सिद्धांत, सौरभ कांबळे असा मोठा परिवार आहे..
ह्या मातोश्री अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ असल्याने सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या होत्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियासह आरे गावावर शोककळा पसरली आहे..