रोणापाल गावात भाजपकडून चार विकासकामांचे भूमिपूजन
बांदा (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पार्टीतर्फे रोणापाल गावात चार विकासकामांचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रोणापाल निगुडे शाळा नं. २ ते खेरकटवाडी भरडवाडी रस्ता मजबुतीकरण करणे, सर्व्हे नं. ९५ ते ९६ दरम्यान जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे, खेरकटवाडी भरडवाडी रस्त्यापासून सर्व्हे नं. ९५ पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण करणे, ख्रिश्चनवाडी येथे थ्री पेस लाईन टाकणे या एकूण १० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, सरपंच योगिता केणी, उपसरपंच कृष्णा परब, ग्रा. पं. सदस्य नमिता शेगडे, उज्वला देऊलकर, अश्विनी गावडे, माजी सरपंच उदय देऊलकर, सुरेश गावडे, राजश्री नाईक, माजी उप सरपंच भिकाजी केणी, ग्रा.पं. सदस्य भोगटे, बूथ कमिटी अध्यक्ष सागर गोठसकर, महिला मोर्चा अध्यक्ष अनादी गावडे, न्हानू शेगडे, अमित शेडगे, संजय गावडे, घनश्याम गावडे, विनोद गावडे, अरुण केणी, राजन केणी, सदाशिव गाड, सनी केणी, कृष्णा केणी, सुनील गाड, अनंत गावडे, भिकाजी परब, समीर गावडे, रवींद्र गावडे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ख्रिश्चनवाडी येथील कार्यक्रमाला नॅटी मार्णेकर, सायमन रॉड्रिक्स, हेरिक मार्णेकर, धस्पार मार्णेकर, जॉन मार्णेकर, आल्बेत मार्णेकर, व्हेरोनिका मार्णेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध केल्याबद्दल सरपंच योगिता केणी यांनी आभार व्यक्त केले.





