कणकवली दत्तकृपा निवारा शेड जवळ घडली घटना ; तीन कारमधून आलेल्या
टोळक्याने दांड्याने, दगडाने केली मारहाण…
कणकवली (प्रतिनिधी) दि.११ मार्च २०२४
कणकवली बांधकरवाडी येथील फिर्यादी चेतन दिलीप पवार (वय २५) व
त्याच्यासोबत असलेले सुनील चव्हाण
यांच्यावर १० मार्चला रात्री ८ वाजता
शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला संशयित आरोपी रणजीत जाधव, लक्ष्मण सुळ (रा.वळीवंडे तालुका देवगड) यांच्यासह ८ ते ९ जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी चेतन दिलीप पवार हे आपल्या जीसेबी ऑपरेटर सुनील चव्हाण हे दोघे दत्तकृपा निवारा शेड मध्ये सोबत बसले
होते. त्यावेळी तीन कारमधून आरोपींसह विचारणा केली ? तसेच शिवीगाळ करीत आरोपी याने स्कॉर्पिओ गाडीतून लाकडी दांडके घेऊन येत तोंडाला रुमाल बांधून
आलेल्या आरोपींनी लाकडी दांड्याने व
दगडाने मारहाण करीत फिर्यादीला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी कणकवली पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वी कलम ३२६, ३२३, १४३, १४७, १४८, १४९
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.





