बांद्यात संत सोहिरोबानाथ जयंती उत्साहात साजरी
बांदा दि १ मार्च २०२४ (मंगल कामत)
बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेच्या दिवशी संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या जयंती सोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत मठात “नाथ सेवा उत्सव” चालणार आहे.जयंतीदिनी सकाळी संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा ,अभिषेक होऊन त्यानंतर तीर्थप्रसादास प्रारंभ झाला.
त्यानंतर संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन करण्यात आले.सायंकाऴी स्थानिक महिलांची भजन सेवा सादर झाली.सायं 7.30 वाजता नित्य सायंआरती झाली.त्यानंतर रात्री स्थानिक भजनकर्मींनी आपली भजनसेवा अर्पण केली.दिवसभरात नाथ भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.





