श्लोक पठाण स्पर्धेत पूर्वी, स्वरा, राजाराम,  समृद्धी प्रथम ; सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे आयोजन

93

श्लोक पठाण स्पर्धेत पूर्वी, स्वरा, राजाराम,  समृद्धी प्रथम ; सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे आयोजन

बांदा (मंगल कामत) दि . १ मार्च २०२४

        सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मनाचे श्लोक, पसायदान व मारुती स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दिपप्रज्वलनाने केले. या प्रसंगी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष अजित कवठणकर, कार्यवाह पांडुरंग हळदणकर, सल्लागार नारायण बागकर, सदस्य प्रसाद मांजरेकर, महेंद्र मांजरेकर, नाना शिर्के, दिपक जाधव, संज्योती पेडणेकर, अमित पिळणकर, सचला आरोलकर, कुंदा कुबल, बाबी मेस्त्री, शरद राऊळ, संतोष चव्हाण, सुषमा पोपकर, ग्रंथपाल संजय कवठणकर, पालक, वाचक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी कुसुमाग्रज व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.

श्लोक पठण स्पर्धेत ४६ मुलांनी सहभाग दर्शविला. स्पर्धा बालगट पहिली, दुसरी, बाल गट ३री व ४थी, लहान गट ५ वी ते ७वी, मोठा गट ८ वी ते १०वी  या चार गटात घेण्यात आली. स्पर्धेचा निकाल (बालगट) प्रथम पूर्वी संतोष चव्हाण, द्वितीय कृष्णा सुदेश कवठणकर, तृतीय तन्वी गणेश टेमकर. (बालगट ३ री व ४थी) प्रथम स्वरा संदीप सातार्डेकर, द्वितीय विहान नकुळ केरकर, तृतीय ऋत्विता शिवा टेमकर. (५वी  ते ७ वी) प्रथम राजाराम दिपक पेडणेकर, द्वितीय श्रीशा सचिन राऊळ, तृतीय यशिका सुधाकर वेंगुर्लेकर. (८ वी ते १० वी) प्रथम समृद्धी संदीप सातार्डेकर, द्वितीय श्रावणी हेमंत धुपकर, तृतीय मृणाली दिलीप म्हालदार.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाच्या लिपिक उत्कर्षा आरोंदेकर, स्नेहल बागकर, रवींद्र कवठणकर यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक ग्रंथपाल संजय कवठणकर, सुत्रसंचालन ज्ञानेश्वर मांजरेकर आणि आभार पांडुरंग हळदणकर यांनी मानले . स्पर्धेचे परीक्षण बाबी मेस्त्री व शरद राऊळ यांनी केले. स्पर्धेतील सर्व यशस्वी मुलांचे ग्रंथालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.