पत्रकार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या  राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित 

146

पत्रकार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या  राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित 

 

बांदा (मंगल कामत) दि. १ मार्च २०२४

बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा जाहिर झालेला राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पंढरपूर (जि. सोलापूर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला.
हॉटेल विठ्ठल ईन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत रेपाळ हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर टेंभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री लोंढे, ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशी संस्थेचे सचिव चंदन बनसोडे, अध्यक्ष विमल बनसोडे, श्रीमती सुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल या संस्थेने घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी बोलताना श्री मोरजकर म्हणाले की, हा सन्मान आपला नसून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. यापुढे पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत राहणार आहे. यावेळी त्यांच्या मातोश्री निकिता मोरजकर, नैतिक मोरजकर, पत्रकार यश माधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले.