आमदार नितेश राणेंच्या हस्ते वागदे ग्रामसचिवालयाचे 5 मार्च रोजी भूमीपूजन

46

आमदार नितेश राणेंच्या हस्ते वागदे ग्रामसचिवालयाचे 5 मार्च रोजी भूमीपूजन

ग्रामपंचायतसह मंडळअधिकारी, तलाठी कार्यालय, विजवितरण, पोस्ट ऑफिस असणार एकाच छताखाली

वागदे सरपंच संदीप सावंत यांची माहिती

कणकवली ( तुळशीदास कुडतरकर)दि १ मार्च २०२४

केंद्र सरकारच्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत वागदे ग्रामसचिवालय इमारतीचे काम मंजूर करण्यात आले आहे .महाराष्ट्र राज्यातील ७३ ग्रामपंचायतींनाच सदर अभियानात घेण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हयातून २ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला. त्यामध्ये कणकवलीतून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले. या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, विद्युत वितरण कार्यालय, पोस्ट ऑफीस, बचत गट ग्रामसंघ कार्यालय इत्यादी कार्यालये एकत्रितरित्या होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सरपंच सदीप रमाकांत सावंत यांनी जि. प. च्या माध्यमातून ८ गुंठे जागेची परवानगी घेऊन सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे.अशी माहिती दिली.

आमदार नितेश राणे यांचे शुभहस्ते व मा, गटविकास अधिकारी उच्च स्तर (वर्ग १) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ०५/०३/२०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे.