महिलांनी स्वतःची व कुटुंबाची आरोग्य विषयक काळजी घेणे महत्त्वाचे – माजी प्राचार्या सौ सुखदा जांभळे
देवगड (प्रतिनिधी) दि २९ फेब्रुवारी २०२४
आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून महिला घराच्या बाहेर पडते तेव्हा सुरक्षितची जबाबदारी त्या महिलेची असते. अशावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. देवगड तालुक्यातील बचत गटातील महिला या प्रामाणिक काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे या महिलांनी आपली स्वतःची त्याचबरोबर कुटुंबाची ही आरोग्य दृष्ट्या काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन देवगड महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सौ सुखदा जांभळे यांनी
केले.
देवगड येथे नगरपंचायतीच्या वतीने इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित केलेल्या महिला बचत गट उत्पादन खाद्य महोत्सव तसेच महिला मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात बोलताना केले.देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने महिला बचत गट निर्मित खाद्य महोत्सव व महिला मेळावा तसेच अंगणवाडी ५%राखीव निधी टक्के अनुदानातून वॉटर फिल्टर वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित केलेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सुखदा जांभळे तसेच नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत मुख्याधिकारी सुरज कांबळे, करं निर्धारण अधिकारी रोहित पाटील, भाजपा गटनेते शरद ठुकरुल, नगरसेवक विश्वामित्र खडपकर
अन्नपूर्णा स्वयं सहाय्यता बचत गटाच्या संचालिका उषकला केळुस्कर उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यानंतर खाद्य महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत मुख्याधिकारी सुरज कांबळे व अन्य नगरसेवक नगरसेविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. आकर्षक रांगोळी काढलेल्या महिलेचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच बचत गटांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .या निमित्ताने उपनगराध्यक्ष मिताली सावंत,नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले . यावेळी बोलताना सौ जांभळे म्हणाल्या ,आजच्या काळात मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांच्या वर समान संस्कार होणे गरजेचे आहे असे नमूद केले.या सोहळ्यात महिला बाल कल्याण समिती ५% राखीव निधी अंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील अंगणवाडी याना वॉटर फिल्टर चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचलन प्रास्तविक अस्मिता जाधव यांनी केले.





