सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व आरोंदा या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून १० बांगलादेशी नागरिकांना अटक केली याबद्दल आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलिस दलाचे अभिनंदन केले

77

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व आरोंदा या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून १० बांगलादेशी नागरिकांना अटक केली याबद्दल आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलिस दलाचे अभिनंदन केले

कणकवली (तुळशीदास कुडतरकर) दि २६ फेब्रु २०२४

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी बांदा व आरोंदा येथे छापा टाकून बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सिंधुदुर्ग पोलिसांनी या केलेल्या कामगिरीबद्दल आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

 

आमदार राणे यांनी पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, हा प्रकार गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने सदरहू बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी करून त्यांनी भारतात प्रवेश कसा केला? या कामी त्यांना कोणी मदत केली? ‘त्यांचे साथीदार कोण? सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का? त्याचप्रमाणे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करण्यामागे त्यांचा हेतु काय होता? या दृष्टीने तपास करून जनतेच्या मनातील निर्माण झालेली भिती दूर करावी, अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आमदार नितेश राणे यांना यांनी पाठविले आहे.