नगरपंचायत कार्यक्षेत्रातील खाडीकिनारी भागात लवकरच होणार भूमिगत विद्युत वाहिनी  काम – बुवा तारी

22

पाणी आरक्षण दाखला देवगड जामसंडे नगरपंचायतीस प्राप्त

नगरपंचायत कार्यक्षेत्रातील खाडीकिनारी भागात लवकरच होणार भूमिगत विद्युत वाहिनी  काम – बुवा तारी

देवगड (प्रतिनिधी)दि.२५ फेब्रु. २०२४

देवगड जामसंडे येथील नागरिकांच्या गेला कित्येक वर्षाचा प्रमुख प्रश्न असलेल्या नळ योजना प्रश्न आता मार्गी लागणार आहे. कोर्ले सातेंडी धरणावरून या योजनेचा ५७ कोटीचा नवीन योजनेच्या प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र योजनेसाठी पाणी आरक्षण दाखला मिळणे आवश्यक होते. अनेक राजकीय अडचणी पार पाडत हा दाखला मिळाला आहे. त्यामुळे नळ योजनेच्या प्रश्न आता मार्गी लागणार आहे. मात्र आता निधीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून आमदार नितेश राणे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी देवगडच्या जनतेसाठी तरी राजकारण बाजूला ठेवून राजकीय कुठलेही अडथळे न आणता निधी आणण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केले आहे.
देवगड शिवसेना उबाठा गटाच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, नगरसेवक नितीन बांदेकर, तेजस मामघाडी, माजी नगरसेवक विकास कोंयंडे आदी उपस्थित होते.

तारी पुढे म्हणाले ,देवगड तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनीसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून १४० कोटी निधी मंजूर झाला आहे.या निधीमधून देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील खाडी किनारी भागातील १५ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील भूमिगत विद्युत वाहिण्याचे कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
यामध्ये मळई ,आनंदवाडी, देवगड बंदर, बाजारपेठ किल्ला, वेळवाडी, कावलेवाडी, तरवाडी ,आदी खाडी किनारा भागांच्या समावेश असल्याची माहिती नगरसेवक तारी यांनी दिली. सांगितले.