देवगड येथे सकल मराठ्याची समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवास

38

देवगड येथे सकल मराठ्याची समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवास

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव देवगड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन संदीप साटम,श्री व सौ केदार सावंत या उभयतांचे हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले. यादरम्यान देवगड शहरात निखिल लंच होम शेजारी देवगड तालुका सकल मराठा समाज कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आकर्षक चित्ररथातून प्रतिकात्मक मानवी प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा देवगड सडा, देवगड बाजारपेठ देवगड किल्ला या मार्गावरून काढण्यात आली.

 

देवगड किल्ला येथे गणपती मंदिरात दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी बांधलेल्या रंगमंचावरती सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय घोषणा दिल्या. यावेळी स्वरा भिडे व वीरा पारकर या दोन चिमुकल्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम , अविनाश सावंत, दयानंद पाटील, योगेश राणे, किसन सूर्यवंशी, शरद ठुकरुल, तुषार पाळेकर, सदानंद सावंत ,संजीव राऊत, सदानंद देसाई , राजू भुजबळ , शामराव पाटील, अमित कदम , सूर्यकांत पाळेकर, ऋतिक धुरी ,शिखर गोळवनकर, सानवी शिंदे, शितल जोईल आदिसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.