इन्सुली गावठाण येथील शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी
बांदा (प्रतिनिधी)
इन्सुली गावठण येथील शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर व मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळकरी मुलांनी केलेले सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरले.
इन्सुली गावठणवाडी येथील शिवाजी चौक मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते.या निमित्ताने हजारो शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. सोमवारी सकाळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर व मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, माजी सरपंच नाना पेडणेकर, बाळू मेस्त्री, नितीन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, सोनाली मेस्त्री, निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष गावकर, व्हा चेअरमन दीपक इन्सुलकर, पोलीस पाटील जागृती गावडे, नुतन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, रघुवीर देऊलकर, आजो परब, उल्हास गावडे. सदा कोलगावकर, मनोहर गावकर, अनिल आईर, राघोबा जाधव, तारामती नाईक, दाजी जाधव, शंभा नाईक, , विशाल गावडे, निळकंठ सावंत, अमोल शिरोडकर, अमेश कोठावळे, अरविंद जाधव, योगेश जाधव, विनय परिट, रुपेश परब, कृष्णा परब, हेमंत नाईक, नंदू नाईक, गजेंद्र कोठावळे, स्वामी पेडणेकर, देवा सावंत, अनिल गावडे आदीसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे, तात्या वेंगुर्लेकर, काका चराटकर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पालव यांनी तर आभार विनोद गावकर यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . सायंकाळी नाईक मोचेमाडकर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.





