अखेर तो आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी हटविला
वेंगुर्ले (प्रतिनिधी)
भाई,आता खराच पुरे झाला, “थांबा आता
५ वर्षात एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास” पाच वर्षात जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका…असा मजकूर त्या फलकावर लिहुन असा फलक म्हापण भोगवे परुळे भागात लावण्यात आलाय.
तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आलेला हा फलक म्हापण, परूळे,भोगवे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडिया वर या फलकाचे फोटो जोमाने व्हायरल होत आहेत.. सकाळी साधारण 11 वा. सुमारास निवती पोलिसांकडून हा फलक हटवण्यात आलाय.





