सावंतवाडी सहकारी पतपेढीचे व्हाईस चेअरमनपदी  ॲड. संजू शिरोडकर यांची निवड

56

सावंतवाडी सहकारी पतपेढीचे व्हाईस चेअरमनपदी  ॲड. संजू शिरोडकर यांची निवड

सावंतवाडी – प्रतिनिधी

सावंतवाडी सहकारी पतपेढीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.यावेळी पतपेढीचे व्हाईस चेअरमन म्हणून सावंतवाडी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांची निवड झाली.त्याप्रसंगी माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई,मनोज नाईक, आनंद नेवगी,अजय गोंदवले,दिलीप भालेकर,विनोद सावंत,विजय रेडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.