श्री देव मानसीश्वर वार्षिक जत्रोत्सव संपन्न;आमदार वैभव नाईक यांनी दिली उत्सवास भेट
वेंगुर्ले (प्रतिनिधी)
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या बत्त्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव मानसीश्वराचा आज वार्षिक जत्रोत्सव.. भल्या पहाटे अडीच ते तीन वाजल्यापासूनच मानसीश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि नवसाची निशाण काठी रोवण्यासाठी भाविकांची मोठी रांगच लागली होती. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मानसीश्वराच दर्शन घेतले. गर्दीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये आणि येणाऱ्या सर्व भाविकांना शांततेत दर्शन मिळावे व भाविकांच्या गाड्यांचे योग्य पद्धतीने पार्किंग करता यावं यासाठी वेंगुर्ला पोलिसांनी चोक व्यवस्था केली होती…





