वेंगुर्ला तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तन्वी , सोनाक्षी प्रथम

47

वेंगुर्ला तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तन्वी , सोनाक्षी प्रथम

हस्ताक्षर महर्षी विकास गोवेकर यांनी केले स्पर्धेचे परीक्षण

बांदा (मंगल कामत)

 

श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांचे वतीने ‘जागतिक हस्ताक्षर दिना’ निमित्त वेंगुर्ला तालुका मर्यादित हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात मोठा गटातून तन्वी हेमंत मेस्त्री, सानिया सुधाकर गावडे, गायत्री लक्ष्मण वरगावकर यांनी क्रमांक पटकावले तर पूर्वा विनोद चव्हाण हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. तसेच लहान गटातून सोनाक्षी संदीप देसाई, दीपेश सुनिल विटेकर, तुषार सूर्यकांत परब यांनी क्रमांक पटकावले तर प्रसाद प्रविण पडते यांने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे वाचनालयाने तसेच नंदकिशोर मांजरेकर यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेचे परिक्षण हस्ताक्षर महर्षी विकास गोवेकर यांनी केले.