दिविजा वृद्धाश्रम आयोजित पाककला स्पर्धेत सौ स्वरा राणे प्रथम

124

दिविजा वृद्धाश्रम आयोजित पाककला स्पर्धेत सौ स्वरा राणे प्रथम

देवगड (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या आश्रमातील ध्वजारोहण प्रमुख अतिथी सौ अमृता थळी यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रमाच्या वतीने पाककला स्पर्धा आयोजित केली होती.या पाककला स्पर्धेत स्वरा राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

आजी-आजोबांना झेंडावंदन करताना पाहून मला शालेय जीवनातील एक क्षण आठवले येथील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य पाहायला मिळाले असे यावेळी सौ थळी यांनी सांगितले.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रम येथे गावातील महिलांसाठी पौष्टिक पदार्थ या विषयावर पाककला स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गावातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणत व त्याची सुंदर सजावट करून मांडणी देखील केली होती.

या पाककला स्पर्धेमध्ये सौ स्वरा मयूर राणे यांनी प्रथम क्रमांक, सौ अस्मि प्रसाद राणे द्वितीय क्रमांक, सौ अनुजा अनंत आचरेकर तृतीय क्रमांक, तर सायली सुभाष तांबे सौ मंजिरी मंदार राणे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. या स्पर्धेसाठी असलदे गावातील २० महिलांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १००० रु व साडी, द्वितीय क्रमांक ७०० रु व साडी, तृतीय क्रमांक ३०० रु व साडी तर उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी २०० रु व साडी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सौ शरयू ठुकरुल, सौ मृणाल कुलकर्णी, श्रीमती आचरेकर यांनी केले यावेळी स्वस्तिक फाउंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेटये, सदस्य संध्या गायकवाड किरण नारायणकर आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.