सावंतवाडी आगारातील चालक शिवराम दिनकर मुळीक यांनी न्याय मिळावा यासाठी 26 जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा
सावंतवाडी – प्रतिनिधी
आपल्यावर अन्याय कारक कारवाई झाल्याबद्दल सावंतवाडी आगारातील चालक शिवराम दिनकर मुळीक यांनी न्याय मिळावा यासाठी 26 जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक याना निवेदनातून दिला आहे.
शिवराम मुळीक यांनी 13/12/2023 रोजी विनाकारण गैरहजर ठेवल्यासंदर्भात व अतिकालीक भत्यासंदर्भात तक्रारीचे निवेदन आगार व्यवस्थापक, सावंतवाडी यांना सादर केले होते. परंतु त्यांनी या आगाराचे आगार व्यवस्थापक या नात्याने सदरच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतलेली नाही व माझ्या तक्रारीचे अद्यापपर्यंत निवारण केलेले नाही. तसेच दि.१८/०५/२०२२ ते दि.०९/०६/२०२२ या कालावधीत प्रशासनाने आपणाला निलंबित केले होते. परंतु सदर कालावधीची माझी रजा खर्च करुन पगार काढला. मग मला निलंबित का केले? किंवा रजा खर्च का केली? याचा खुलासा करावा. मग रजा खर्च केली तर निलंबन कालावधीत डेपोत हजर राहण्याचे बंधन कशासाठी? यामुळे आपले आर्थिक नुकसान झाले आहे असे मुळीक यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रण याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी न्याय हक्काने न्याय मागण्यासाठी दि.२६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ८.०० वाजता सावंतवाडी आगारात हे निवेदन प्रसारित करुन लाक्षणिक उपोषणास बसणार असून याकामी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यास सर्वस्वी आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक जबाबदार असतील असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच उपोषण करते वेळी माझ्या जीवीतास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची कल्पना मुळीक यांनी निवेदनात दिली आहे.





