गोगटे वाळके महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू.

26

गोगटे वाळके महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू.

बांदा प्रतिनिधी २५ जानेवारी २०२४

येथील गोगटे- वाळके महाविद्यालयात दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीचे ‘कॅम्पस इंटरव्ह्यू ‘ आयोजित करण्यात आले आहेत. आजी-माजी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने ही मुलाखत महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर यांनी केले आहे.
या मुलाखतीच्या अधिक माहितीसाठी नियुक्ती प्रमुख प्रा. रमाकांत गावडे (9421090965) यांच्याशी संपर्क साधावा. सदर मुलाखत शनिवारी दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.