कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी या कारणासाठी केले आवाहन

146

 

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी या कारणासाठी केले आवाहन

सावंतवाडी – प्रतिनिधी

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून 26 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजता सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर प्रलंबित मागण्यासाठी होणाऱ्या रेल्वे स्थानक येथील लाक्षणिक उपोषणाला सर्व नागरिकांनी, विविध संस्था, संघटना, व्यापारी संघटना, रीक्षाचालक संघटना, वकिल – डॉक्टर संघटना तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी बांधव भगिनी आणि युवकांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी उपाध्यक्ष सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे.