नियमांचे उल्लंघन होत असल्याने क्रशर बंद करा अन्यथा उपोषण सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला इशारा

155

 

नियमांचे उल्लंघन होत असल्याने क्रशर बंद करा अन्यथा उपोषण सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला इशारा

सावंतवाडी – प्रतिनिधी

सोनुर्ली गावाच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन करुन क्रशर उत्खनन व क्रशींग करीत असून त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान होत असल्याने सदर क्रशर तात्काळ बंद करावी यासाठी दीपक नाईक व ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा निवेदन देऊन दिला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावालगत मोठ्या प्रमाणात क्रशरने काळा दगड उत्खनन व्यवसाय चालते.या ठिकाणी क्रेशर मध्ये उत्खनन होत करण्यासाठी मोठमोठी आवाज करणारी मशिनरी व त्याचप्रमाणे ब्लास्टिंग केले जाते.
यामुळे ध्वनी प्रदूषणा बरोबर धुळीमुळे हवा प्रदूषणा होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत बागेचे नुकसान होते. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच त्या क्रशर व्यवसायामुळे निर्माण होणारे प्रदुषित पाणी हे शेतीमधून, तसेच गावातील मुख्य प्रवाहात सोडले जात आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच फळबागायत व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात डस्ट येऊन अतोनात हानी होत असून मुख्य प्रवाहातील पाण्यावर दोन सार्वजनिक विहीरी असून त्यावर नळपाणी योजना चालू आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.त्याचबरोबर ०१ कि.मी. अंतरावर रेल्वे ट्रैक व ब्रीज असल्यामुळे त्यांना ब्लास्टिंगच्या हादऱ्यांमुळे ब्रीज कोसळून भविष्यात मोठी मानवहानी होऊ शकते. हयाला जबाबदार कोण? अशा अनेक समस्या सोडली गावाच्या लगत सुरू असणाऱ्या क्रशर व्यवसायामुळे निर्माण झालेले आहेत.तरी सर्व नियम धाब्यावर बसवूनसुरू असलेला क्रशर व्यवसाय मुदत संपूर्ण सुरू असून तो तात्काळ बंद करावा अन्यथा 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयांना नजीक ग्रामस्थ शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा निवेदनातून तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
उपोषणाचे दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार सदर पाटील यांनी उपोषणकर्ते दीपक नाईक व ग्रामस्थ शेतकरी यांची एकत्रित बैठक सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपरोक्त अनाधिकृत बेकायदेशीर क्रशिंग व प्रदुषणाविषयी आम्ही गावातील ग्रामस्थांनी विविध शासकीय कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आजतागायत सदरचे बेकायदेशीर क्रशिंग सुरु असून आम्हा ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. तरी सोनुली गावातील अनधिकृत क्रशर दि.२५ जानेवारी २०२४ पुर्वी बंद न केल्यास प्रजासत्ताक दिन दि. २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत सोनुर्लीच्या ध्वजस्तंभाजवळ उपोषण / आत्मदहन करणे नाईलाजास्तव भाग पडणार आहे. आमच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार आहे याची नोंद घेऊन त्वरीत सदरचे बेकायदेशीर क्रशिंग बंद करणेस विनंती आहे.