वरेरी येथे राममंदिर निमत्रण अक्षता कलश यात्रा
देवगड (प्रतिनिधी)
संपूर्ण जगाचे अयोध्येत राममंदिर जन्मभूमीवर साकारणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटनाकडे लक्ष लागून राहिले आहे. सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी मंदिराचे उद्घाटन होत असून संपूर्ण देशभरात अवतपूर्व सोहळा राहणार आहे. याच निमित्ताने वरेरी तळेबाजार या ठिकाणी राम भक्तांच्या वतीने निमंत्रण अक्षता कलश यात्रा वरेरी ते तळेबाजार अशी शोभायात्रा काढण्यात आली.

वरेरी येथील भावई मंदिर ते तळेबाजार बाजारपेठ पर्यंत ही अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते विनायक पारकर, रुपेश पारकर, यांच्यासह वरेरीतील असंख्य भाविक रामभक्त , वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी या मिरवणुकीत सहभागी झालेली पाहायला मिळाली.







