बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग असोसिएशनची सभा रविवारी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आली आहे.
यावेळी विविध कंपन्यांच्या अल्बमचा डेमो व जेष्ठ फोटोग्राफरचे मार्गदर्शन होणार आहे. सर्व फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर तसेच सभासदांनी वेळेत सकाळी १०.३० वाजता फॉररेस्ट रिट्रीट, बांदा (ता. सावंतवाडी) येथे उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश गोवेकर यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित राहणाऱ्या नवीन फोटोग्राफरनी व सभासदांनी 9422636599, 7709486599 या नंबरवर रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. असे गोवेकर यांनी निवेदनांतून कळविले आहे.




