कणकवली : तालुक्यातील जि. प. शाळा हरकुळ खुर्द येथे वन वणवा, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष याबाबत फोंडा परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करूत चित्रफित दाखवली.
या निमित्ताने जनजागृती देखील करण्यात आली. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व वन विभागाचे कर्मचारी अधिकारी श्री. अ. भी. जाधव, वनरक्षक फोंडा अतुल खोत, महानिंग शेगावे, अतुल पाटील, अनिल राख, बबन बागवे, चंद्रकांत लाड उपस्थित होते. यावेळी वन विभागाच्या वतीने वणवा प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यात आला.





