प्रमोद मसुरकर यांची शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी निवड…!

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखपदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. दरम्यान आपल्याला पक्षाच्या आदेशांनुसार व ध्येय धोरणानुसार काम करायचे असून संघटना वाढीसाठी सर्वांना एकत्रित घेऊन जोमाने कार्य करावे, अशा शुभेच्छा यावेळी त्यांना देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तेजस राणे, कन्हैया पारकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.