राजस्थानमध्ये बस अपघात, दोघांचा मृत्यू, 20 विद्यार्थी जखमी
जयपूर वृत्तसेवा..
राजस्थानमधील पाली येथील सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरात आज गुरुवारी सकाळी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर 20 शाळकरी मुले जखमी झाली.
पोलीस अधिकारी लक्ष्मण सिंह यांनी सांगितले की, गुजरातमधील महेसाणा येथून रामदेवरा येथे जाणाऱ्या स्कूल बसची सुरमेरपूर बायपासवर पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक बसली. या अपघातात बसमधील प्रवासी प्रकाश आणि विपुल भाई यांचा मृत्यू झाला, तर 20 शाळकरी मुले जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, Rajasthan Bus accident रामदेवरा येथे शैक्षणिक दौऱ्यावर जाणाऱ्या बसमध्ये शाळकरी मुले, शिक्षक आणि कर्मचारी असे 52 जण प्रवास करत होते. 11 जखमी मुलांना शिवगंज रुग्णालयात नेण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या नऊ मुलांना सिरोही येथे पाठवण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले व क्रेनच्या साहाय्याने खराब झालेली Rajasthan Bus accident वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. नातेवाईक पोहोचल्यानंतर शवविच्छेदन केले जाईल. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत





