शिंदे गटाची शिवसेना खरी निर्णय जाहीर होताच मालवणात शिवसेनेचा जल्लोष
मालवण | प्रतिनिधी :
शिवसेना (शिंदे गट) हीच खरी शिवसेना या निर्णयासह शिवसेनेच्या बाजूने विधिमंडळात निकाल लागल्यानंतर मालवण शहर भरड नाका येथे मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली.
यावेळी शिवसेना मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, शिवम हिर्लेकर, अरुण तोडणकर, कमलाकांत पारकर, धीरज केळुसकर, नितेश पेडणेकर, हर्षद पारकर, कमलेश सारंग, श्रीहरी खवणेकर यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





