देवगड जामसंडे नगरपंचायत मासिक सभेत कचरा प्रश्नावरून खडाजंगी
देवगड (प्रतिनिधी)
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन याचा प्रश्न हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे गेली सात वर्षे झाली तरी कचऱ्याच्या प्रश्न सुटण्याऐवजी तो वाढतच आहे आणि याच कचऱ्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्या वारंवार शाब्दिक बचावाची होत आहे. कचरा प्रश्न सोडविण्याऐवजी कचरा प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांना, विरोधक सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.नगरपंचायत होऊन सात वर्षे झाली मात्र नगरपचायतीत कचरा प्रश्न अद्याप सुटला नसून तो वाढत आहे. या कचरा प्रश्नावर वेळीच तोडगा न काढल्यास भविष्यात कचऱ्याचा प्रश्न मोठ्या पद्धतीने चिघळणार हे नाकारता येत नाही.आज मंगळवार 9 जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या मासिक सभेत देखील
नगरपंचायतीच्या कचरा निर्मूलनाचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला . आजच्या सभेत देखील भाजप नगरसेविका व नगराध्यक्षांना यामध्ये कचरा प्रश्नावरून खडाजंगी झाली.
देवगड नगरपंचायतीचे मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सौ मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, बांधकाम सभापती तेजस मामाघाडी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांनी कचरा विषयावरून आक्रमक होऊन नगराध्यक्षांना चांगले धारेवर धरण्याचा प्रयत्न केला .मात्र दाभोळे येथे करारावर घेतलेल्या जागेत कचरा विलगीकरण न करता एकत्र तसेच टाकला जात आहे. असा आरोप करीत अटीत शर्तीचे पालन न केल्यामुळे दाभोळे ग्रामपंचायत यांनी हरकत दाखल रद्द केला असे असताना नगराध्यक्षांनी गेल्या सभेत चुकीची माहिती का दिली. असा सवाल करत विरोधकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले. यावेळी नगरसेवक बुवा तारी यांनी मागणी केल्यानुसार कचरा आंबा बागायतदार घेऊन जात आहेत कचऱ्याची योग्य विले वाट लावली जात आहे. सत्तेत असताना टेंबवली येथे कचरा डम्पिंग खरेदीसाठी 22 गुंठे जागेचे काय केले. गावचा विरोध असताना त्यावेळी जागा का खरेदी केली असा संवाद करीत नगरसेवक बुवा तारी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर केले चांगलेच कात्रीत पकडले .त्यामुळे कचरा विषयावरून सत्ताधारी विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोंपामुळे सभा गाजली.
दोन वर्षे सत्ताधारी नगरसेवक आणि जिल्हा वार्षिक नगरोस्थान मधून सुचवलेली कामे व त्या अनुषंगाने कामाच्या पाठविलेल्या आराखड्यात ठराविक नगरसेवकांचीच कामे मंजूर होऊन आली. मात्र सत्ताधारी नगरसेवकांची कामे मंजूर होऊन आणली नाही. नगरपंचायत कडून ओरोस येथे कामांचा आराखडा गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांचीच कामे वगळली जातात असा आरोप नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केला. याविषयी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. देवगड जामसंडे पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती करणे या कामास मदत वाढ देणे या विषयावर झालेल्या चर्चेवेळी संबंधित ठेकेदारांनी चार वर्षे सहा महिन्याचे आपले 52 लाख रुपये अदा करण्यात आले नाही असे पत्र मुख्याधिकारी यांना दिले असल्याची माहिती सभागृह प्रशासनाकडून देण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रस्तावित विकास कामांसाठी सीआरझेड ना हरकत दाखले यासाठी एजन्सी नेमणूक करण्यात यावी. या विषयावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते शरद ठुकरुल यांनी घरबांधणी करणाऱ्या घरमालकाला सीआरझेड ना हरकत दाखला मिळण्यासाठी हेलफाटा माराव्या लागतात. त्यामुळे याच एजन्सी मार्फत त्यांना परवानगी मिळून द्यावी अशी सूचना केली. किल्ला खवणेकर घराजवळील शौचालय व मळई जेटी येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचा विषय चांगलाच गाजला . सत्ताधारी नगरसेवक व परिवार नितीन बांदेकर यांनी दीड वर्षे होऊन गेले. तरी संबंधित ठेकेदार शौचालय दुरुस्तीचे काम अद्याप केले नाही. त्या ठेकेदाराला एक महिन्याची मुदत वाढ द्या व त्याच्याकडूनच दंड वसूल करा अशी मागणी केली. यावर भाजपाकडून नेते शरद ठुकरुल यांनी त्या कामाची निविदा काढावी अशी मागणी केली. या मागणीला सत्ताधारी नगरसेवकांनी आक्षेप घेतला एक महिन्याचीच मुदत वाढ द्या व काम पूर्ण करून घ्या अशी मागणी केली.





