अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा पिकाची नुकसान भरपाई द्यावी, तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या वतीने देवगड भाजपचे तहसीलदार निवेदन
देवगड (प्रतिनिधी)
अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहे.
देवगडचे तहसीलदार खत्री यांची आज भेट देऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडून आंबा कलमावरील मोहोर व आंबा फळांचे नुकसान झाले आहे.
आंबा उत्पादन समाधान कारक व्हावे या हेतूने खते, किटकनाशके, मेहनत मजूरी, यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकन्यांची निराशा केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला आंबा बांगायतदार, हाता तोंडाशी आलेले आंबा पिक वाया जात असलेले पाहून हताश झाले आहेत.
तरी सदर घटनेचे गांर्भीय विचारात घेवून संबंधीत नुकसानी बाबत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला सूचित करावे तसेच पिक विमा रक्कमेचा पूर्ण परतावा देखील तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यांना सूचना कराव्यात. अशा आशयाचे निवेदन देवगड तहसिलदार यांना देण्यात आले.यावेळी माजी जि.प सदस्य गणेश राणे, पडेल सरपंच , भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील, कृषी सेलचे अध्यक्ष भूषण बोडस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.





