राजापूर येथील मेळाव्याला देवगडातील हजारों कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे-आम.रवींद्र फाटक
देवगड (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानच्या राजापूर येथे आयोजित केलेल्या शिवसेना पक्ष संघटनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने रवींद्र फाटक देवगड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी देवगड शासकीय विश्रामगृह येथे राजापूर येथील पक्ष संघटना मेळाव्याला देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शिवसंपर्क अभियान यशस्वी करावे असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी देवगड येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद करताना केला.
यावेळी देवगड तालुक्यातील फणसे येथील 25 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे उपजिल्हाप्रमुख संदेश सावंत पाटील ,जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख विलास साळसकर, दिनेश गावकर, अमोल लोके ,दीपक वेतकर ,बापू धुरी ,आदी उपस्थित होते





