- मिठमुंबरी येथील श्री स्वामी समर्थ
मठाचा कलशारोहन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
कणकवली
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीच येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठाचा कलशारोहन आणि स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला. देवदूत अभिषेक गावकर श्री स्वामी समर्थ मिठमुंबरी यांच्या वतीने 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर रोजी स्वामी समर्थ मठात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव संपन्न झाला .या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतष बाजीत करण्यात आले. 25 ते 26 डिसेंबर या दिवशी होम हवन व धार्मिक विजेचे आयोजन करण्यात आले होते 27 डिसेंबर बालब्रह्मचारी श्री मांडवकर यांनी रोजी कलश पूजन करून कलशा रोहन सोहळा वारकरी संप्रदायाचे विलास जाधव वरेरी, विजय घाडी दाभोळे, गणेश गावकर मिठमुंबरी यांच्या हस्ते पार पडला. श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पूजन श्री संत बाळूमामा मंदिर कोंडामाचे अध्यक्ष बबन बोडेकर उभयता यांच्या हस्ते श्री स्वामी भक्त आत्माराम गावकर यांचे उपस्थितीत पार पडला.





