उबाठा शिवसेना गटाच्या रहाटेश्वर सरपंचा कल्पना बलवंत कदम यांचा भाजपामध्ये प्रवेश
देवगड (प्रतिनिधी)
उबाठा शिवसेना गटाच्या राहटेश्वर सरपंच कल्पना बलवंत कदम
ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते जामसंडे भाजपा पक्ष कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजप चिटणीस संतोष किंजवडेकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नितेश राणे हे ग्रामीण भागाचा विकास करू शकतात हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला असे प्रवेशा दरम्यान सरपंच कल्पना कदम यांनी सांगितले.सरपंच कल्पना कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने विशेषतः शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांना चांगलाच धक्का बसला आहे.





