वरेरी येथील कॉजवे पुलाचे व ग्रामपंचायत नुतणीकरण कामाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

39

वरेरी येथील कॉजवे पुलाचे व ग्रामपंचायत नुतणीकरण कामाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगड (स्वप्नील लोके)

देवगड तालुक्यातील वरेरी भावईदेवी येथील (कॉजवे) पुल , ग्रामपंचायत नुतनीकरण या कामांचे भूमिपूजन आमदार श्री.नितेश राणे व सामाजिक कार्यकर्ते श्री.विनायक पारकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य,कार्यकर्ते गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरेरी येथील या कमी उंचीच्या कॉजवेमुळे पावसाळ्यात बहुतांशी वेळा वरेरी गावाची संपर्क तुटत होता.त्यामुळे या कॉजवेची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने येथील ग्रामस्थांकडून होत होती.यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक पारकर यांनी यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती.या कॉजवेचे भूमिपूजन झाल्याने येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.