सावंतवाडीतील या सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत पणदुरकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे यांची बिनविरोध निवड
सावंतवाडी
सावंतवाडी कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या अध्यक्ष पदी लक्ष्मीकांत पणदूरकर,तर उपाध्यक्ष पदी हेमंत मराठे यांची बिन विरोध निवड
सावंतवाडीच्या कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये निवडून आलेल्या संचालकांमधून आज संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.आज झालेल्या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत पणदुरकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल मावळते अध्यक्ष प्रमोद गावडे व उपाध्यक्ष सदानंद चव्हाण यांनी नवनीयुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थित संचालकांनी पदभार स्वीकारल्याबद्दल अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आरोंदेकर यांनी काम पाहिले.तसेच यावेळी संचालक चंद्रकांत उर्फ संजू दत्ताराम शिरोडकर,उमाकांत सदाशिव वारंग,रामू सरजू पाटील,श्रीमती कमला मुकुंदम मेमन,धनश्री हेमंत मराठे आदी संचालक व कर्मचारी उपस्थित होते.



