Google search engine
Home अपघात माकडाची दुचाकीवर उडी, दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत;देवगड येथील घटना

माकडाची दुचाकीवर उडी, दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत;देवगड येथील घटना

25

माकडाची दुचाकीवर उडी, दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत;देवगड येथील घटना

देवगड प्रतिनिधी

माकडाने थेट दुचाकीवर उडी मारल्याने मळई येथील दुचाकीस्वार विनोद उर्फ तातू कोयंडे याचा पायाला दुखापत झाली आहे.ही घटना बुधवारी सायंकाळी 4,30 वा. सुमारास देवगड मळई रस्त्यावर क्रॉसवेल टेलर समोर घडली

तातू कोयंडे हे देवगड येथुन घरी मळई येथे जात असताना त्यांचा दुचाकीवर माकडाने थेट उडी मारली. यावेळी दुचाकी त्यांच्या पायावर पडल्याने त्यांचा पायाला दुखापत झाली त्यांना डॉ आठवले यांचाकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले