प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या समस्ये बाबत दिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

178

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या समस्ये बाबत दिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी (प्रतिनिधी)

सावंतवाडी – निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक उपचारासाठी गेले असता वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी या करिता उत्तम परब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देऊन केली आहे.

तळवडे येथील उत्तम भगवान परब हे रविवार दिनांक २४/१२/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजलेच्या दरम्याने आरोग्य केंद्र निरवडे येथे आकस्मिक वैद्यकीय उपचाराकरिता गेलो असता, आरोग्य केंद्र निरवडे येथील वैद्यकीय सेवा देणारे दोन्ही आरोग्य अधिकारी हे अनुपस्थित होते. त्याजागी संजय राठोड हे समुदाय आरोग्य अधिकारी रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते. यावेळी वेळी तपासणी केल्यानंतर ड्युटी डॉक्टर बद्दल त्यांना विचारले असता, मी ओटवणे मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम असल्याचे सांगितले, व ड्युटी वरील डॉक्टर यांची ओपीडी बघण्यासाठी डॉक्टर हे माझे मित्र म्हणून बसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे वैद्यकीय शिक्षण विचारले असता BSc. नर्सिंग असे समजले. या वैद्यकीय पात्रतेच्या अधिकाऱ्यास रुग्ण तपासणीसाठी बसण्यास परवानगी
आहे का व कसे हे आम्हाला समजावे अशी मागणी परब यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. श्री. राठोड हे रुग्णांना रेफर शीट/पत्र देत होते. याचा पुरावा असून एखादा BSC नर्सिंग अधिकारी रेफर शीट/पत्र देवू शकतो का व कसे हेही पडताळून पाहावे असेही परब यांनी नमूद केले आहे. सदर आरोग्य केंद्रामध्ये दोन पैकी कोणी एक आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती गरजेची होती परंतु असे न होता दोन्ही आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यानंतर दुसऱ्या एका डॉक्टरांना तपासणीसाठी बोलाविण्यात आले त्यावेळी त्यांना परब यांनी अशी विचारणा केली की आपल्याला या आरोग्य केंद्रांचा चार्ज मिळाला आहे का? तर नाही असे उत्तर मिळाले. तरी ड्युटी वरील डॉक्टर कुठल्याही चार्जशिवाय इतर कोणालाही आपल्या जागी बसवू शकतात का व कसे याची खातरजमा करून या विषयामध्ये आपण स्वतः लक्ष घालून या बाबत सविस्तर चौकशी करुन दोषी ड्युटी डॉक्टरवर त्वरित कड़क कारवाई करावी, व ग्रामस्थांना त्रास व अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी उत्तम भगवान परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदन देऊन केली आहे.