छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविणार
देवगड (स्वप्नील लोके)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचविण्यासाठी सागरी सीमा मंचने परिक्रमेचे आयोजन केले आहे. शिवरायांच्या आरमाराची अनुभूती घेण्यासाठी शिडाच्या नौकेने मुंबईचे विजयदुर्ग हा सागरी प्रवास होणार आहे. यादरम्यान चार ठिकाणी सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाचे जागरण आम्ही करणार आहोत अशी माहिती सागरी सिमा मंचचे प्रांत संयोजक केतन अंभिरे यांनी दिली.
सागरी सीमा मंच व शिवशंभू विचार मंच या दोन संस्थेद्वारे शिड्याच्या नौकेने गेटवे ऑफ इंडिया ते विजयदुर्ग अशी परिक्रमा करण्यात येणार आहे. या परिक्रमेसाठी भारतीय तटरक्षक दल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सीमा शुल्क भारत सरकार, सागरी पोलीस मत्स्य व्यवसाय विभाग, यांचे सहकार्य मिळाले आहे. बुधवारी 27 डिसेंबरला कुलाबा मच्छीमार नगर येथे सागरी परिक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाहक विठ्ठलराव कांबळे आणि शिवशंभू विचार म्हणजे ब्रांच संयोजक अभय जगताप यांचे हस्ते होणार आहे. या परिक्रमेमध्ये 30 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत सागरी परिक्रमेदरम्यान खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, सुवर्ण गड ,पद्ममगड ,रत्नदुर्ग ,आणि विजयदुर्ग या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम किल्ला पूजन किल्ला दर्शन आधी उपक्रम होणार आहेत. अलिबाग बुरुंडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक जानेवारीला सायंकाळी सात वाजता सागरी परिक्रमेचा समारोप विजयदुर्ग येथे होणार आहे. येथील कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सर्कल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे आणि सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे उपस्थित राहणार आहेत .यावेळी अंभीरे म्हणाले की, सागरी सीमांच्या सुरक्षा चे महत्व जाणणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. त्यांनी स्थानिक मावळ्यांना घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्याचप्रमाणे किनारपट्टीवरही आरमाराची उभारणी करता नाही. त्यांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या मंडळींना सोबत घेतले त्यांना स्वराज्य आरमाराचे महत्त्व सांगितले .सागरी किनारपट्टी सुरक्षित राहणे कसे आवश्यक आहे ते त्यांच्या मनावर बिंबवले त्यातूनच सरखेल कानोजी आंग्रे ,मायनाक भंडारी ,हिरोजी यांच्यासारखे लढवय्ये घडविले. आजची परिस्थिती बदलली असली तरी सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व तितकेच आहे .मुंबईतील बॉम्बस्फोट असो किंवा ताज वर झालेला हल्ला असो शत्रुने सागरी सीमानाचाच वापर केला .त्यामुळे सागरी किनारपट्टीवरही राहणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षेचा स्थायीभाव रुजणे आवश्यक आहे. समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण गंभीर होत चालले आहे .याचे गंभीर परिणाम समुद्रसृष्टीतील जीवांबरोबर मनुष्यावरही होत आहेत. प्लास्टिक मुळे अनेक विषारी द्रव्य मच्छीच्या माध्यमातून मनुष्य पर्यंत पोहोचत आहे. या प्रदूषणाला आपणच सर्वाधिक जबाबदार असल्याचे असल्याने ते रोखण्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे सागरी परिक्रमेदरम्यान या दोन विषयांची जनजागृती आम्ही करणार आहोत. सागरी परिक्रमेदरम्यान अलिबाग बुरुंडी रत्नागिरी आणि विजयदुर्ग या ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे. तसेच मच्छिमार बांधवांनी समुद्रमार्गे प्रयाण करणाऱ्या परिक्रमावासियांचे समुद्र स्वागत करावे असे आवाहन यावेळी अंभिरे यांनी केले.





