दिविजा वृद्धाश्रमातील आजी -आजोबांची अशी भरली बालवाडी.!

47

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमातील आजी – आजोबांची बालवाडी घेण्यात आली. शाळेत असतानाचे दिवस पुन्हा अनुभवता यावेत, खेळता दंगामस्ती करता यावी, यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या बालवाडी उपक्रमाचा शुभारंभ बालवाडीच्या शिक्षिका सौ. सुषमा चव्हाण, किरण घाडी,  सौ. संगिता राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले.

वृद्धपकाळ म्हणजे दुसरे बालपण.! याच बालपणाचे दिवस पुन्हा शाळेत अनुभवाता यावेत या उद्देशाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची अनुभवता यावेत यासाठी या आजी-आजोबांची बालवाडी उपक्रमाचे आयोजन केले गेले. आपल्या लहानपणी बालवाडीचा पहिला दिवस ते बालवाडीतील अनेक गीते नृत्य अशी मज्जा सगळे यावेळी अनुभवायला मिळाले. बालवाडीतील या आजी-आजोबांना शाळेचे कपडे देण्यात आले आजी आजोबांना एका रांगेत येऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना बडबड गीते तसेच गोष्टी आजी-आजोबांचे खेळ घेण्यात आले .
बालवाडी घेण्याच्या उद्देश सांगताना स्वस्तिक फाउंडेशन म्हणाले की या वयोगटातील आजी-आजोबांची बालवाडी उपभोगली नव्हती त्यांना बालवाडीचा आनंद काय असतो, बालवाडी शिस्त लावली जाते. कशाप्रकारे शिक्षण दिले जाते याचा अनुभव बघण्यासाठी या बालवाडीचे कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. या बालवाडीमुळे आजी आजोबांच्या मानसिक स्वास्थातही बराच बदल होतो. एक दिवसाचा या कार्यशाळेत आजी आजोबांची मने उत्साहीत होत जातात. थकलेल्या जीवाला पुन्हा जोमाने लढत पुढे घेऊन जाण्याची ताकद येते. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग व संस्थेचे ट्रस्टी संदेश शेटये, व वृद्धाश्रमातील आजी आजोबा व ग्रामस्थ उपस्थित होते.