हैदराबाद, म्हैसूर जोडले जाणार | आठवड्यातून दोन दिवस मिळणार सेवा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळावरून १ फेब्रुवारीपासून आय.आर.बी इनफ्राच्या माध्यमातून अलायन्स एअरची दुसरी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईबरोबर आता हैदराबाद व म्हैसूर ही महत्वाची शहरे सिंधुदुर्गला जोडली जाणार आहेत.

सुरुवातीला आठवड्यातून रविवार आणि बुधवार अशी दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती आय. आर. बी. च्या माध्यमातून देण्यात आली आहे. याबाबत कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे.





